वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे गांधारी येथील पक्षी निरीक्षण


कल्याण :  वॉर रेस्क्यू फाऊंडेशन  ही नोंदणीकृत संस्था असून वन्यजीव संरक्षणसंवर्धनसंशोधनजनजागृती अशा अनेक विषयांवर काम करत आहे. यातील प्रमुख विषय म्हणजे "सामान्य पक्षी गणना"  या कार्यक्रमामध्ये शास्त्रीय पद्धतीने दोन चौरस किलोमीटर ग्रीडवर प्रत्येक ऋतूमधील पक्ष्यांची निरीक्षण करून वनविभाग व बीएनएचएस सारख्या संस्थांना माहिती पुरवून संकलन केले जाते.


शनिवारी गांधारी ब्रीज जवळील नदीलगतच्या फॉरेस्ट हद्दीतील जागेवर सर्व सामान्य नागरिकांसाठी पक्षी निरीक्षण व अधिवास या विषयी सहल आयोजित करण्यात आली होती. दरम्यान पाणथळ जागेतील व गवताळ जागेतील असे एकूण ३३ पक्षी आढळून आले. 


यात प्रामुख्याने प्लम हेड पोपटइंडियन रॉबिनइंडियन गोल्डन ओरीयलएशियन ओपनबिल्ल इतर ग्रासल्यांड,  पाणथळ जमिनीवरील पक्षी आढळून आले. यावेळी वॉर संस्थेचे सुहास पवारललिता अष्टेकर यांनी पक्षी निरीक्षक म्हणून काम केले. त्याच बरोबर पक्षीप्रेमी म्हणून कमलेश माळीसुनील डोईफोडेपूनम डोईफोडे यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.


वाढते शहरीकरण व प्रदूषण पक्षी संख्येवर याचा परिणाम झाला आहे.  आपल्याला परिसरातील पक्ष्यांची कमीजास्त होणारी संख्या व पर्यायाने त्यांना व त्यांच्या अधिवासाला निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी सर्व एकत्र येऊन जनजागृती केली पाहिजे असे आव्हान वॉरच्या स्वयंसेवकांनी केले.

Post a Comment

0 Comments