ठाणे जिल्ह्यातील पायाभूत विकास कामांसाठी राज्यमंत्री कपिल पाटील यांची मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिल्ली येथे बैठक संपन्न ,तीनहात नाका ते वडपे रोपवे बनविण्याची मागणी


भिवंडी :दि.11 (आकाश गायकवाड  ) ठाणे जिल्ह्यातील विविध महत्वाच्या पायाभूत प्रकल्पां संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन  कपिल पाटील यांनी अत्यंत महत्वाच्या, जनतेच्या गरजेच्या पायाभूत प्रकल्पां संदर्भात प्रस्ताव मांडले असून त्यामध्ये तीनहात नाका, ठाणे ते वडपा बायपास, भिवंडी पर्यंत प्रवाशांसाठी रोपवे उभारला जावा यासाठीचा प्रस्ताव कपिल पाटील यांनी मांडला आहे. 

   
         या मार्गावर दररोज सुमारे 8 लाख प्रवासी प्रवास करतात.परंतु वाहतूक कोंडीची समस्या तसेच सार्वजनिक वाहतूक साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रवास त्रासदायक ठरतो. रोपवेद्वारे लोकांना सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल आणि वेळेची बचत होईल असा प्रस्ताव मांडला असून नितीन गडकरी यांनी सदरचा प्रस्ताव नाविन्यपूर्ण भारतातील दुसराच प्रकल्प ठरणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीनेही लाभदायक ठरू शकतो. याकरिता प्रकल्पाचा प्रारूप प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिले.


           या बैठकीत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण-मुरबाड-माळशेज घाट (NH61) महामार्गाचे चौपदरीकरण करणे, राष्ट्रीय महामार्ग NH -548A (MSRDC) च्या कामाचा आढावा घेणे, माळशेज घाट येथे आणि कल्याण-निर्मल रस्त्यावरील बोगदा येथील संरक्षण काम यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आले. 


          ठाणे-पालघर जिल्ह्यातील शिळफाटा- काटई- नेवाळी नाका- बदलापूर- बोरड पाडा- म्हसा- वैशाखरे- माळशेज घाट रस्ता, भिवंडी वाडा मनोर रस्ता, शिरसाठ पाडा- अंबाडी- वाशिंद रस्ता, चिंचोटी- अंजूरफाटा- माणकोली रस्ता या रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची तसेच ठाणे जिल्ह्यातील रोड ओव्हर ब्रिज (ROB) उभारण्याची मागणी केली असता नितीन गडकरी यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली आहे . 


           याशिवाय बहुचर्चित प्रकल्प माळशेज घाटात पारदर्शक (काचेचा) ब्रिज उभारण्या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाली असून  महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. या व्यतिरिक्त बदलापूर रिंग रोड आणि त्याच्या बाजूला सरकारी जमिनीवर लॉजिस्टिक पार्क उभारण्या बाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह सकारात्मक चर्चा झाली असून त्याप्रमाणे तात्काळ प्रस्ताव  पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले असून लवकरच सर्व कामे मार्गी लागतील', असा विश्वास व्यक्त करीत येत्या काळातील रस्ते व वाहतुक संदर्भातील ठाणे जिल्ह्यातील ही कामे बदल घडवणारी ठरणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments