पेसमेकर डान्स अकादमीचा डोंबिवलीत आगळा वेगळा व्हॅलेंटाईन डे ...


डोंबिवली ( शंकर जाधव )  येथील प्रसिद्ध पेसमेकर डान्स अकादमीने 'व्हॅलेंटाईन डे' आगळ्या- वेगळ्या  "पद्धतीने साजरा केला. अकाडमीचे संचालक योगेश अरविंद पाटकर  यांनी यांनी यंदा सदर केलेल्या साल्सा डान्समधुन सगळी नाती जोडण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यात संवाद  गाठभेट कमी होत चालली आहे.


          प्रसिद्ध पेसमेकर डान्स अकादमीने 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त वडील आणि मुली मध्ये किंवा मुलगा आणि आई मध्ये, भाऊ बहिणी मध्ये, विवाहित जोडप्यांमध्ये व तसेच मित्र-मैत्रिणींमध्ये, तर साल्सा डान्स मार्फत, व्हॅलेंटाईन डे निमित्त हे सगळे नाते जोडण्याचा  प्रयत्न केला. 


           ब्राह्मण सभेच्या सभागृहात  वर्क शॉपमध्ये  प्रोफेशनल  प्रशिक्षक सौमित्र पवार यांनी  साल्सा डान्स शिकविला.दोन दिवसाच्या या वर्कशॉप मध्ये ५० हून अधिक जण सहभागी झाले होते. ८ ते 60 या वयोगटातील लोकांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments