सम्राट अशोक विद्यालयात भरले बाल साहित्य संमेलन


कल्याण : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा दिनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सम्राट अशोक  विद्यालयात बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.


शालेय अभ्यासक्रमातील कुसुमाग्रजांचे साहित्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या भूमिकेत  येवून आणि कवी कुसुमाग्रजबहिणाबाई चौधरीसंत ज्ञानेश्‍वरसंत गाडगेबाबासंत तुकाराम संत तुकडोजी महाराज आदी. अनेक प्रकारच्या वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व कुसुमाग्रजांचे साहित्य सादर केले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कुसुमाग्रजांच्या भूमिकेतील इयत्ता आठवी चा विद्यार्थी भावेश कासार होता. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे उपस्थित होते.


 सूत्र संचालन इयत्ता नववीच्या  विद्यार्थिनी साक्षी सानप व समीक्षा परदेशी यांनी केले. तर पायल आडे या विद्यार्थिनीने आभार  मानले. रविवारी सुट्टी असल्याने एक दिवस अगोदरच आम्ही मराठी भाषा दिवस साजरा केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिली.

Post a Comment

0 Comments