९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शैक्षणिक शिल्पकृतीची मनसेकडून स्वच्छता


डोंबिवली ( शंकर जाधव )१८ सप्टेंबर  २०१६  रोजी आगरी युथ फोरमच्या वतीने डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. त्यावेळी डोंबिवली पूर्वेकडील  सावित्रीबाई नाट्यगृहाजवळ मराठी साहित्य संमेलनाच्या शैक्षणिक शिल्पकृतीची तयार करण्यात आली.मात्र या शिल्पकृतीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.याकडे मनसेने लक्ष दिले आहे. 


           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार  प्रमोद (राजू ) पाटील, जिल्हाध्यक्ष  प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत  ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे  ह्यांच्या सहकार्याने  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराच्या वतीने  २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा गौरव दिवसाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील  सावित्रीबाई नाट्यगृहाजवळील ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शैक्षणिक शिल्पकृतीची  स्वच्छता करून सुशोभीकरण करण्यात आले. 


          कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ह्या प्रतिकृतीची दुरावस्था झालेली होती. दारूच्या बाटल्या, वेफर चे पॉकेट, पेपर अजून बरेच काही होते. त्या भागात  घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून  स्वछता करत धुवून तो भाग सुशोभीत करण्यात आला.


         ह्या प्रसंगी शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, जयदीप मांडोले, उपशहर अध्यक्ष दीप्तेश नाईक, परेश भोईर, सुहास काळे, विभाग् अध्यक्ष मधुर वालिपकर,  शाखा अध्यक्ष ललित पाटील, हेमंत पाटणकर, कुणाल मोर्या, प्रतिक .  ,निखिल जोशी, महाराष्ट्र सैनिक प्रेम पाटील तसेच अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.आम्हीत करत असेलेल्या कामाचे तिथल्या नागरिकांनी कौतुक केले आणि मनसेच्या हातून अशीच लोकोपयोगी कामे व्हावीत ह्या शुभेच्छा दिल्याचे मनवीसे शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments