पेटीएम कडून यूपीआय मनी ट्रान्सफर वर '४ का १०० कॅशबॅक ऑफर लाँच'

■मोहिमेसाठी युजवेंद्र चहल, हरभजन सिंग व ख्रिस गेलसोबत सहयोग ~

मुंबई, १० फेब्रुवारी २०२२: भारतातील आघाडीची डिजिटल पेमेण्ट्स व आर्थिक सेवा कंपनी पेटीएमची मालक वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज ६ ते २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत खेळवण्यात येणाऱ्या आगामी पेटीएम भारत वि. वेस्ट इंडिज एकदिवसीय व टी२० सामन्यांच्या मालिकेदरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफर्सवर आकर्षक कॅशबॅक व इतर रिवॉर्डसची घोषणा केली. अत्यंत गतीशील मनी ट्रान्सफर्स सेवा देणाऱ्या पेटीएम यूपीआयचा अधिकाधिक युजर्स अवलंब करत आहे, जे अत्यंत सुरक्षित व विश्वसनीय आहे.


      सामन्यांच्या दिवशी नवीन युजर्सना '४ का १०० कॅशबॅक ऑफर'चा लाभ घेता येईल, जेथे त्यांना पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून मनी ट्रान्सफरसाठी १०० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. नवीन युजर्सना ४ रूपयांच्या सर्व मनी ट्रान्सफर्सवर या ऑफरचा लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त युजर्स रिफरल उपक्रमामध्ये सहभाग घेत अतिरिक्त कॅशबॅक मिळवू शकतात. युजर यूपीआय मनी ट्रान्सफर्ससाठी पेटीएमचा वापर करण्यास मित्र व कुटुंबातील सदस्याला आमंत्रित करेल, तेव्हा रेफरर व रेफ्री या दोघांना १०० रूपयांची कॅशबॅक मिळू शकते.


     या ऑफरचा प्रचार करण्‍यासाठी पेटीएमने भारतीय क्रिकेटर्स युझवेंद्र चहल, हरभजन सिंग आणि वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू ख्रिस गेल यांच्‍यासोबत ऑनलाइन मोहिम लाँच केली आहे. व्हायरल झालेल्या या मोहिमेमध्ये तिन्ही खेळाडू पेटीएमच्या कॅशबॅक ऑफरबाबत धमाल गमतीजमती करताना दिसले. 


     पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, "पेटीएम यूपीआय अत्यंत गतीशील व सुरक्षित मनी ट्रान्सफर्स सेवा देते, जी लाखो युजर्सना सोयीसुविधा देते. या आगामी क्रिकेट हंगामामध्ये आमची १०० रूपयांची कॅशबॅक देत स्पेशल ऑफरसह आमच्या युजर्ससोबत खेळाचा आनंद घेण्याची इच्छा आहे."


       युजर्स पेटीएम अॅपचा वापर करत काही मिनिटांमध्येच पेटीएम यूपीआयसाठी नोंदणी करू शकतात. ही सेवा त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामधून विनासायास व सुरक्षितपणे ऑनलाइन पेमेण्ट्स करण्याची सुविधा देते. तसेच ही सेवा त्यांना लिंक केलेल्या खात्यामधील शिल्लक रक्कम मोफतपणे तपासण्याची आणि कोणताही यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करत पेमेण्ट्स करण्याची सुविधा देखील देते.

Post a Comment

0 Comments