भिवंडी : दि.17(प्रतिनिधी ) पुरोगामी व प्रगत राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात राजकारणाचा स्तर अतिशय खालावल्याने दोन्ही बाजूं कडून बेझुट आरोप प्रत्यारोप होगा असल्याने सर्वसामान्य नागरीकांच्या प्रश्नां कडे दुर्लक्ष होत असल्या ची खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते बाळा नांदगावकर यांनी बोलून दाखविली आहे .
ते भिवंडी येथे मनसे शहर सचिव अजय हजारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्या नंतर पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे ,ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,भिवंडी लोकसभा क्षेत्राध्यक्ष शैलेश बिडवी,शहराध्यक्ष मनोज गुळवी उपाध्यक्ष बालाजी गुळवी यांसह मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा वर भ्रष्टाचाराचे आरोप करीत टीका केली त्यावर बोलताना बाळा नांदगावकर यांनी राजकारणात आरोप प्रत्यारोप जरूर व्हावेत परंतु या साटमारीत सर्वसामान्य जनते कडे सत्ताधारी व विरोधक या दोघांचेही दुर्लक्ष होत असल्याचे सांगत आरोप प्रत्यारोप करण्या पेक्षा समाजा च्या प्रश्नां कडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज असून महाविकास आघाडी च्या शासन काळात समाजातील कोणताही घटक समाधानी नसून दहा रुपयात थाळी घोषित केले ते निदान पोटभर जेवणाचे समाधान जनतेला मिळालं का असा प्रश्न उपस्थित करत, दहा रुपयात जेवण देऊ शकत नाहीत .
तर समाधान कोठून मिळणार दहा रुपयात जेवण देणारे यांचे ठेकेदार, कोव्हिडं सेंटर चे कॉन्ट्रॅक्टर झाले अशी कोपरखळी मारत मनसे कार्यकर्ते ठाणे जिल्ह्यात आवेशाने काम करीत असल्याने यांच्या आरोप प्रत्यारोपांना कंटाळलेली जनता मनसे कडे पर्याय म्हणून नक्कीच बघत आहे असा विश्वास शेवटी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला .
0 Comments