भिवंडीतील शिक्षणासाठी युक्रेन मध्ये प्रतीकने पाय ठेवला आणी युद्ध सुरु झाले,तर मुस्कान किव मधील बँकर मध्येच अडकलेली..


भिवंडी दि 26  (आकाश गायकवाड  )  वैद्यकीय एमबीबीएस चे शिक्षण घेण्यासाठी भारतातील अनेक विद्यार्थ्यांची पसंती युक्रेन या देशाला असून आईवडिलांचे उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न उराशी बाळगून युक्रेन येथे पोहचताच युद्धाला सुरवात झाल्याने हताश होऊन माघारी होण्याची वेळ आली असताना घरी कुटुंबियांची सुरू झालेली तगमग मन हेलावून टाकणारी आहे .


          तर कीव या युद्ध मध्ये सर्वाधिक हानी पोहचलेल्या शहरात मुस्कान बँकर मध्ये भयभीत होऊन अडकून पडली असून तिचे कुटुंबीय ही आपल्या मुलीच्या माघारी येण्या कडे डोळे लावून बसले आहेत.भिवंडी शहरातील महानगरपालिकेत लेबर युनियनचे काम करणारे संतोष चव्हाण यांचा मुलगा  प्रतीक संतोष चव्हाण हा  वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मधील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला असता प्रवेश प्रक्रिया पार पडणाऱ्या एजन्सी ने 21 फेब्रुवारी रोजी युनिव्हर्सिटी मध्ये ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया व एक परीक्षा असल्या कारणे तात्काळ 22 फेब्रुवारी रोजी युक्रेनला जाणे गरजेचे असल्याचे सांगितले .


             परंतु तेथील युद्धजन्य परिस्थिती मुळे प्रतीक चे आईवडील त्यास पाठविण्यास तयार नसताना एजन्सीने या प्रवेश व परिक्षे साठी प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने आम्ही प्रतीक यास त्याच्या सोबतीने 28 विद्यार्थी गेले 23 रोजी सर्व युनिव्हर्सिटीत पोहचून परीक्षा देत असतानाच त्यांना युद्ध सुरू झाल्याचे युनिव्हर्सिटी कसून सांगण्यात आल्याने हॉस्टेल मध्ये थांबण्यास व फक्त गरजेपुरते साहित्य सोबत घेऊन तयार राहण्यास सांगितले .या बातमी नंतर प्रतीक चे कुटुंबीय भयभीत होऊन गलितगात्र झाले .


            त्यानंतर भारतीय दूतावास व इंडियन स्टुडंट असोसिएशन यांच्या प्रयत्नातून प्रतीक माघारी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुकडीत येत असल्याचे समजले असता कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला असून जो पर्यंत प्रतीक घरी परतत नाही तोपर्यंत भय मात्र कायम आहे . भिवंडी  तालुक्यातील तालुक्यातील पडघा येथील राहणारे फिरोज शेख हे भिवंडी महापालिकेत कर्मचारी असून त्यांची मुलगी  मुस्कान फिरोज शेख ही एमबीबीएस च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची सुध्दा समावेश आहे .


          विशेष म्हणजे युद्धामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या कीव या शहरात ती असल्याने तिच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.एक दिवस आधी मुस्कान ने संपर्क करून बँकर मध्ये मैत्रिणी सोबत असल्याचे सांगितले परंतु त्यानंतर तिचा संपर्क न झाल्याने कुटुंबीय भयभीत असून भारत सरकार ने युक्रेन मध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी प्रयत्न करावेत आमच्या मुलांचा आमच्याशी संपर्क करून द्यावा अशी विनंती मुस्कान च्या आई ने केली आहे .


         प्रतीक चव्हाण हा विदयार्थी विमानत बसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला समजली मात्र मुस्कान शेख ही अद्याही कीव मधील बँकर मध्येच असल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करण्याची मागणी कुटुंबीय करत आहे...

Post a Comment

0 Comments