डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला..

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपाच्या एक कार्यकर्ता दुकानात काम करत असताना अज्ञात इसमांनी  अचानक डोळ्यात मिरचीची पूड टाकून वार केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. त्याच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.तर सदर घटनेची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले होते.


          मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कटके असे हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांचे नाव आहे.त्याच्यावर कोणी हल्ला केला आणि हल्ल्यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.तर घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले.भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची वार्ता समजताच रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे माहिती घेतली.कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.


              याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, भाजप कार्यकर्त्यावर झालेली भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.पोलिसांनी लवकरात हल्लेखोरांना अटक करावी अशी भाजपची मागणी आहे.तर कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असता हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल  असे सांगितले.

Post a Comment

0 Comments