टेट्रा पॅकने वारणा डेअरीसह पहिल्या मेड इन इंडिया होलोग्राफिक पॅकेजिंगची केली सुरूवात


कल्याण : टेट्रा पॅक या जागतिक स्तरावरील पॅकेजिंग आणि प्रोसेसिंग सोल्यूशन्स प्रोव्हायडरने भारतात प्रथमच स्थानिक पातळीवर उत्पादित होलोग्राफिक पॅकेजिंग साहित्य सादर केले आहे. Tetra Pak®️ Reflect नावाचे नाविन्यपूर्ण पॅकेजिंग वारणा या आघाडीच्या सहकारी डेअरीच्या भागीदारीत त्यांच्या १ लिटर तूप (क्लेरिफाईड बटर) पॅकसाठी सुरू करण्यात आले आहे. 


          कलात्मक पॅकेज फूड आणि बिव्हरेज ब्रँड्सना त्यांच्या पॅकमध्ये एक नवीन लक्षवेधी परिमाण जोडण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केले आहे. प्रथमचमहाराष्ट्रातील चाकण येथील टेट्रा पॅकच्या निर्मीती साईटवर होलोग्राफिक पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन केले जाईल. मुंबईमराठवाडा आणि विदर्भावर लक्ष केंद्रित करून टेट्रा पॅकच्या कार्टनमधील वारणा तूप प्रथम महाराष्ट्रात उपलब्ध होईल.


तूप हा भारतामधील पारंपारिक पदार्थ आहेजो शुद्धता आणि  समृद्धीशी निगडीत आहेया उत्पादनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. खाद्यपदार्थांचीविशेषतः खाद्यतेल आणि तूप यांची भेसळ हे भारतातील एक मोठे आव्हान आहे आणि तुपाची वाढती मागणी बनावटीसारख्या गैरप्रकारांना कारणीभूत ठरत आहेज्यामुळे गुणवत्तेबाबत चिंता निर्माण होत आहे.


वारणा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मोहन येडुरकर म्हणाले, “वारणा तूप उत्तम दर्जाच्या दुधापासून बनवले जातेज्यामध्ये उत्तम सुगंध आणि चव आहे. टेट्रा पॅक कार्टन पॅकेज तुपाच्या चांगलेपणाचे संरक्षण करतो आणि त्याची फिरवाफिरव होत नाहीज्यामुळे भेसळ आणि बनावटीची शक्यता कमी होण्यास मदत होते. होलोग्राफिक इफेक्टमुळे तो शेल्फवर वेगळा दिसतोज्यामुळे Tetra Pak®️ Reflect हे आमच्या तूप श्रेणीसाठी योग्य आहे. इतकेच नव्हे तरहा पॅक कागदावर आधारित आणि पर्यावरणास अनुकूल आहेजे आमच्यासाठी महत्त्वाचे प्राधान्य आहे


अन्न सुरक्षा आणि शाश्वततेच्या वचनासाठी टेट्रा पॅक कार्टन जगभरात ओळखले जातात. हवाआर्द्रता आणि सूर्यप्रकाश यांसारख्या बाह्य घटकांसाठी अडथळे निर्माण करून आतले अन्नपदार्थ खराब होऊ नये यासाठी निर्जंतुक कार्टन डिझाइन केले आहेत. त्याच वेळीकार्टन कागदावर आधारित असतात75% कार्टन पेपर-बोर्ड असतात आणि उर्वरित पॉलिमर आणि अॅल्युमिनियम असतात ज्यामुळे अन्नपदार्थ खराब होत नाही. हे कार्टन रीसायकल होण्यासारखे असतात ज्यांपैकी 40% कार्टन भारतामध्ये रीसायकल होतात.

Post a Comment

0 Comments