भिवंडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी..


भिवंडी दि 19 (प्रतिनिधी ) भिवंडी निजामपूर शहर  महानगर पालिकेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने छत्रपती महाराज  शिवाजी चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास  महापौर प्रतिभा विलास पाटील व पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी या चौकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक नामफलकाचे  अनावरण महापौर प्रतिभा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर पालिका मुख्यालयात शिव प्रतिमेस महापौर प्रतिभा विलास पाटील  व आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


             या  कार्यक्रमास  सभागृह नेते विकास निकम, प्रभाग समिती 2 चे सभापती प्रशांत लाड, कर विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील, आरोग्य अधिकारी डॉ.कारभारी खरात,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, सहाय्यक आयुक्त दिलीप खाने, फैजल तातली, सुनील भोईर, बाळाराम जाधव, मार्केट विभाग प्रमुख गिरीश घोष्टेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर  वाचनालय विभाग प्रमुख नेहाला मोमीन, आरोग्य निरीक्षक अशोक संखे, पर्यावरण विभाग प्रमुख नितेश चौधरी, अन्य अधिकारी, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments