"क" प्रभाग परिसरात पदपथावरील अतिक्रमणे निष्कासनाची धडक कारवाई सुरुच


कल्याण  :-   महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व सहा. आयुक्त यांना दिलेल्या निर्देशानुसार "क" प्रभागाचे सहा. आयुक्त सुधिर मोकल यांनी कल्याण पश्चिम येथील जय मल्हार हॉटेल शेजारी असलेल्या २ टप-या निष्कासनाची धडक कारवाई आज केली तसेच खडकपाडा परिसरातील २ भंगार चारचाकी वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा करण्याची कारवाई केली. 


          सदर कारवाई पथक प्रमुख सुखदेव धापोडकर, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी यांचे मदतीने व २ जेसीबी, १ हायड्रा, २ डंम्परच्या सहाय्याने आज करण्यात आली.

Post a Comment

0 Comments