आदर्श शिक्षिका आणि वृत्त निवेदिका ललिता मोरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


कल्याण : ठाणे जिल्ह्यात सामाजिकशैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत असलेल्या आदर्श शिक्षिकाअभिनेत्या, समाजसेविका आणि वृत्त निवेदिका ललिता मोरे यांना एमव्हीएलए भारत ज्योती राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कर्तृत्वाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला.


        ललिता मोरे या शिक्षिका असून शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना कल्याण डोंबिवली महापालिके तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले असून याशिवाय सामाजिकसांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना यापूर्वी जिल्हा,राज्य आणि राष्ट्र स्तरावरील अनेक पुरस्कारानी सन्मानित केले आहे त्यांचे हे कार्य बघून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने "भारत ज्योती राष्ट्रीय शिक्षा रत्न 2022" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  हा सत्कार सोहळा दादर पश्चिम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक कला केंद्र येथे मंगळवारी संपन्न झाला.


पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या मातोश्री शकुंतला विसावे आणि मुलगी डॉ.ऐश्वर्या मोरे हे ही स्टेजवर सोबत होत्या. डॉ महालक्ष्मीप्रेरक वक्ता मनीषा कदमसुप्रसिद्ध कवी रमेश आव्हाड यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबरोबरच ते सुजाण नागरिक घडणे हाच खरा पुरस्कार शिक्षकांसाठी असतो.  कुठलाही पुरस्कार किंवा सन्मान ही लोकांनी आपल्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप असते, त्यामुळे हुरळून न जाता आपले काम पुढे तसेच सुरू ठेवावे अशी प्रतिक्रिया ललिता मोरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments