भिवंडी पंचायत समिती सभापती पदी श्रमजीवी संघटनेच्या अविता भोईर यांची बिन विरोध निवड


भिवंडी : दि. 18 (प्रतिनिधी )  भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदी श्रमजीवी संघटनेच्या शेलार गणातील सदस्या अविता यशवंत भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे .भिवंडी पंचायत समिती मध्ये शिवसेना भाजपा यांच्यात समझोता झाला असून त्यानुसार शिवसेना भाजपा यांच्यात आलटून पालटून तीन तीन महिन्यां साठी वाट्याला येत आहे .सभापती असलेले भाजपाचे महेंद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने नुकताच निवडणूक पिठासन अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.


          या निवडणुकीत सभापतीपदी पदासाठी शेलार गणातून निवडून आलेल्या अविता यशवंत भोईर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली . या वेळी तहसीलदार अधिक पाटील, पंचायत समिती सदस्यां सह श्रमजीवी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर ,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे,युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद पवार,शेलार ग्रामपंचायत सरपंच अँड किरण चन्ने यांसह समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .

Post a Comment

0 Comments