मराठी भाषा दिवस काॅग्रेसची मराठी सही स्पर्धा


ठाणे , प्रतिनिधी : 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा होत असताना मराठी भाषा दिनानिमित्त शहर काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने "मराठी सही स्पर्धा" आयोजित केली असल्याची माहीती शहर काॅग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली.


           27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रम आयोजित केले असता शहर काॅग्रेसच्या वतीने सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत ठाण्यातील अष्टविनायक चौक,चेंदणी कोळीवाडा,ठाणे(पूर्व)येथे मराठी सही स्पर्धा आयोजित केली आहे.या स्पर्धेत मराठीत सही करून सहभागी होता येईल स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिकासह सन्मानित करण्यात येणार आहे .


         या स्पर्धेत देशातील विविध मान्यवरांच्या सह्याचे संकलन करून विक्रम करणारे सतिश लक्ष्मण चाफेकर यांच्यासह ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण आदि मान्यवर उपस्थित राहणार असून ठाण्यातील नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन शहर काॅग्रेसच्या सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments