वानरलिंगी सुळका सर करत शिवरायांना मानवंदना


कल्याण : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज,सुराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीनिमित्त कल्याण च्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी गिर्यारोहण नेहमीच आयोजित करणाऱ्या संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एक अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना देण्यात आली.


         जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्या समोर असलेला वानरलिंगी सुळका ज्याची उंची ही पायथ्यापासून सुमारे ४८० फूट उंच आहे असा हा सुळखा केवळ काही तासांच्या आत सर करून महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली. जमिनीपासून ते सूळक्याच्या पायथ्याची उंची ही सुमारे ३००० फूट उंच आहे त्यामुळे वानरलिंगी सुळखा आहे.


          जंगलातून वाट काढत,वन्य प्राण्यांच्या वावरात नाणेघाटाच्या टोकावरून सूळक्याच्या पायथ्याशी पोहचायला सुरुवात सुमारे सकाळी ०८ वाजता झाली.सदाहरण १ तासाच्या आत पायथ्याशी पोहचल्या नंतर सर्व प्रथम मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघा तर्फे महाराजांची आरती करण्यात आली. आरती झाल्यावर संघाने सुळका सर करायला रोप बांधायला घेतली.


          रोप बांधत असतांना जरा जरी चूक झाली तर थेट खाली सुमारे ३००० फूट दरीत कोसळून मृत्यू होण्याची शक्यता होती त्यामुळे चुकीला माफी नव्हतीच. पण अनुभवी संघाने कोणतीही चुकी न करता आपल्या तंत्रशुद्ध पध्दतीने गिर्यारोहण पूर्ण करून सूळख्या चा कळस गाठून एक वेगळी प्रकारे शिवरायांना मानवंदना दिली.४८० फुटांचा हा सुळका सर करायला सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाला केवळ ३ तासांचा वेळ लागला.


        मोहिमेत पवन घुगे,रणजित भोसले,दर्शन देशमुख, भूषण पवार,अक्षय जमदरे,कल्पेश बनोटे,प्रशिल अंबाडे, प्रतीक अंबाडे, नितेश पाटील,महेंद्र भांडे,सचिन पाटील हे सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments