स्वच्छ प्रभाग व सुंदर प्रभागासाठी नगरसेवक मोहन उगले यांचा पुढाकार प्रभाग ११ मध्ये ओला व सुका कचराचे डस्टबिन वाटप

■बेतुरकरपाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेडकरनगर प्रभागातील नागरिकांसाठी ईश्रम कार्ड शिबिराचे देखील आयोजन...
 

कल्याण : स्वच्छ प्रभाग व सुंदर प्रभागासाठी नगरसेवक मोहन उगले यांनी पुढाकार घेतला असून कल्याण मधील  प्रभाग ११ मध्ये ओला व सुका कचऱ्याच्या डस्टबिनचे वाटप करण्यात आले. तसेच बेतुरकरपाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेडकरनगर प्रभागातील नागरिकांसाठी ईश्रम कार्ड शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 


           यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद मोरे, महिला शहर संघटक सुजाता धारगळकर, महिला शाखा सघंटक नेत्रा मोहन उगले, कल्पना जमदाडे, शाखा प्रमुख अनंता पगार, स्वप्निल मोरे, उपशाखा प्रमुख संदिप पगारे, कार्यालय प्रमुख मोरे, तसेच तमाम शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी उपस्थित होते.


         शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छ प्रभाग व सुंदर प्रभाग या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ११ बेतुरकर पाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेडकर नगर या तिन्ही प्रभागात ओला कचरा व सुका कचराच्या डस्टबिनचे वाटप नगरसेवक तथा विभाग प्रमुख मोहन उगले यांच्या वतीने करण्यात आले.


          तसेच ४ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा पर्यंत प्रभागातील नागरिकांसाठी ईश्रम कार्ड शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले असून या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

0 Comments