थ्यलेसिमिया रुगणासाठी रक्तदान शिबिर संपन्न

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  दिवंगत  भारती सूर्यकांत पारधे हिच्या पाचव्या स्मुर्ती दिनानिमित्त   डोंबिवली पूर्वेकडील  मानपाडा रोडवरील नाना नानी पार्क समोर थ्यलेसिमिया रुगणासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन भारती फाउंडेशन या संस्थेमार्फत करण्यात आले होते. या  शिबिरात समर्पण ब्लड बँक घाटकोपर या रक्तपेढीची मोबाइल रक्त संकलन करणारी बस व त्यांचा डॉक्टर स्टाफ दर्शना उपाध्याय यांनी नियोजन करून दिला. 


         शिबिराची सुरुवात भारती हिच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व फुले वाहून  दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यास आली. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्या शुभ हस्ते रक्तदान रक्तदान शिबिराचे उद्घाटन  करण्यात आले. या प्रसंगी जेष्ट साहित्यिक, विश्लेषक,संपादक दादाभाऊ अभंग, कल्याण डोंबिवली जिल्हा रिपब्लिकन नेते माणिक उघडे उपस्थित होते. 


          शिबिरातील सर्व संकलित रक्त फक्त थ्यलेसिमिया या मुलांनाच दिले  जाणार हे समजल्यावर  शारिरीक विकलांग मल्हार शेवाळे, संतोष पारधे यांनी सुद्धा रक्तदान करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. कार्यक्रमात ४७ जणांचे रक्त संकलित करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना  प्रतिकात्मक गोल्ड मेडल व  प्रमाणपत्र  तर मान्यवरांना सन्मामचिन्ह देऊन गौरवण्यात आले. 
  

           कार्यक्रमास  शिवसेनेचे  कल्याण जिल्हा उपप्रमुख  नगरसेवक सदानंद थरवळ, मनसेचे डोंबिवली शहरप्रमुख मनोज घरत, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार मोरे, एस.बी. जाधव  , फोटोग्राफर जितू भाई, प्रा. शुकाचार्य गायकवाड, प्रमोद वन्ने, आशिष कांबळे, वजसमीन शाह यांचे विशेष सहकार्य लाभले. 


            शिबिरास माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक , संजय विचारे , समीर कांबळे, भारतीय युवा मोर्चाचे नितेश पेनकर, व्याहम ग्रुपचे चिन्मय कामटेकर, वंचित बहुजन आघाडीचे शहर प्रमुख सुरेन्द्रजी ठोके, भारतीय बौद्ध महासभेचे गौतम सुतार गुरुजी, स्मारक संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रविकिरण मस्के सर, रवींद्र गुरचळ, बौद्ध सेवा संघाचे रवी राऊत, उत्तम जोगदंड , अमोल जगदानी, सेफ्टी वेलफेअर चे संस्थापक विशाल शेट्ये, रोटरी क्लब चे राजेश पटेल, ग्लोबल रक्तदाते ग्रुपचे विजय पांचाळ रक्तदान ग्रुप पवन भिसे , विजेंद्र मुरुडकर या सर्वांनी भेट देऊन संस्थेच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
  

           संस्थेच्या वतीने सभासद सचिता साळवी, संध्या पारधे, वर्षा धिवर  यांनी स्थानिक नियोजन योग्य पद्धतीने सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळवी यांनी  केले.तर कोषाध्यक्ष प्रशांत धिवर योग्य आर्थिक नियोजन केले. आभार प्रदर्शन  सूर्यकांत पारधे  यांनी  केले.

Post a Comment

0 Comments