भिवंडी पूर्व विभागात अंगणवाडी वाढविण्या संदर्भात आमदार रईस शेख यांची मागणी


भिवंडी : दि.16( आकाश गायकवाड  ) भिवंडी शहराची लोकसंख्या वाढली परंतु अंगणवाडी यांची संख्या न वाढविल्याने अनेक शासकीय योजनां पासून या कामगार वस्ती असलेल्या शहरातील बालक वंचित राहत असून त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार रईस शेख यांनी बैठकीत केली .

 
         भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रातील समस्यां बाबत त्यांनी मागणी केल्या वरून नुकताच एका बैठकीचे आयोजन महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सदरची मागणी करण्यात आली.या बैठकीस राजमाता जिजाऊ अभियान संचालक जाधव,वरिष्ठ सल्लागार राजू जोटकर,अवर सचिव महेश वरुडकर, प्रकल्प अधिकारी दिग्विजय बेंद्रिकर उपस्थित होते.


           या बैठकी दरम्यान रईस शेख यांनी भिवंडी शहरात स्मार्ट मॉडेल अंगणवाडी स्थापन करण्या सोबत भिवंडी पूर्व क्षेत्रामध्ये (ICDS) अंतर्गत एक प्रकल्प एक अधिकारी नेमण्याची मागणी करीत  भिवंडी शहराची लोकसंख्या सुमारे 8 लाख एवढी असून अद्याप पर्यंत फक्त 4 लाख नागरिकांना या योजनांचा लाभ मिळत होता त्यासाठी शहरात लोकसंख्ये नुसार अंगणवाडी यांची संख्या 200 पर्यंत वाढविण्याची मागणी केली .


        या बैठकीत आमदार रईस शेख यांच्या मागण्या मान्य केल्याने शहरातील या योजनांमध्ये समाविष्ट नसणाऱ्या अतिरीक्त 4 लाख लोकसंख्येला त्याचा फायदा मिळणार असून या कामगार वस्ती अधिक असलेल्या वस्तीतील बालकांना सकस व योग्य आहार मिळणार असल्याची महिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments