दिव्यात भाजपच्या वतीने पाणीटंचाई विरोधात वॉटर,मीटर गटर आंदोलन!

आमदार निरंजन डावखरे, आमदार केळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन...


ठाणे, दिवा  : -  दिव्यात असणाऱ्या भीषण पाणी टंचाई विरोधात दिवा शहर भाजपच्या वतीने गुरुवारी दिवा टर्निंग येथे पालिका प्रशासन व सत्ताधारी यांचा निषेध करण्यासाठी वॉटर मीटर गटर निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली दिवा भाजपने हे आंदोलन केले. दिवा शहरात सर्वच भागात भीषण पाणी टंचाई आहे.नागरिकांना पुरेसे पाणी पिण्यासाठी मिळत नाही.


            नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. पाणी टंचाई असताना दुसरीकडे नागरिकांना पाण्याची बिल मात्र भरमसाठ येत असतात.त्याच बरोबर दिवा शहरात इमारत परिसरात घाणीचे साम्राज्य पहायला मिळते,गटारांची व्यवस्था आढळत नाही. या बाबी लक्षात घेऊन दिवा वासीयांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी दिवा शहरात भाजपच्या माध्यमातून वॉटर मीटर गटर आंदोलन करण्यात आले. 


          यावेळी नगरसेवक संजय वाघूळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष एकनाथ भगत साहेब, विश्वास भालेराव,दिवा भाजपचे रोहिदास मुंडे, अशोक पाटील विजय भोईर,नरेश पवार, गणेश भगत, सचिन भोईर,रोशन भगत,अंकुश मढवी, युवराज यादव,समीर चव्हाण,जयदीप भोईर,नागेश पवार,वीरेंद्र गुप्ता,प्रशांत अबोणकर,माजी महिला अध्यक्षा सौ.सीमा भगत,राजश्री मुंडे,रेश्मा पवार,शीला गुप्ता आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments