योगी नाहीत अजिबात दागी त्यामुळे निश्चित निवडून येणार आहेत आदित्यनाथ योगी - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या सभांचा आणि कवितांचा झंझावात

 

गोरखपूर दि. 28 :-  योगी नाहीत दागी;त्यामुळे निवडून येणार आदित्यनाथ योगी अशा अनेक  कविता सादर करीत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेत रंगत आणली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही  ना.रामदास आठवले यांच्या कवितांना दाद दिली. 


        उत्तर प्रदेश च्या   निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचार असून या सर्व टप्प्यांत नारामदास आठवले यांच्या सभांना आणि कवितांना लोक प्रचंड प्रतिसाद देत आहेत. येत्या दि.3 मार्च रोजी ना.रामदास आठवले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत वाराणसी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.


योगी नही है दागी

चुनकर आयेंगे आदित्यनाथ योगी

अखिलेश यादव की हो जायेगी हार

बीजेपी करेगी तिनसोपार 

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पद पर होजायेगे स्वार

      

            ये लढाई हम जितेंगे आरपार ! अशी कविता ना.रामदास आठवले यांनी आज गोरखपूर येथे सादर करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बहुमतांने  विजयी करण्याचे आवाहन केले. गोरखपूर रेती रोड; आर्यनगर आदी ठिकणी प्रचारयात्रा ;गोरखपूर; संत कबीर नगर येथे प्रचारसभांना ना .रामदास आठवले यांनी  संबोधित केले.

Post a Comment

0 Comments