पेटीएमचा कर्ज पुरवठा व्यवसायात नवीन विक्रम, पेमेंट्स मधील आघाडीचे स्थान भक्कम

■कर्जपुरवठा व्यवसायाच्या व्याप्तीमध्ये महिन्यात १.९ दशलक्ष कर्जांच्या वितरणापर्यंत वाढ ~


मुंबई, १६ फेब्रुवारी २०२२ : भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा कंपनी, ब्रॅण्ड पेटीएमची मालकी धारण करणाऱ्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने जानेवारी, २०२२ या महिन्यातील वित्तीय तपशील जाहीर केले आहेत. कंपनीच्या कर्जपुरवठा व्यवसायातील वाढीचा वेग वाढला असून ऑफलाइन पेमेंट विभागातील आघाडीचे स्थानही अधिक भक्कम झाले आहे. याची परिणती मासिक व्यवहार करणा-या वापरकर्त्यांच्या संख्येतील आत्तापर्यंतच्या सर्वाधिक वाढीमध्ये झाली आहे तसेच जीएमव्हीमधील वाढही कायम राहिली आहे.


     प्लॅटफॉर्मद्वारे वितरित केल्या गेलेल्या कर्जांची संख्या जानेवारी २०२२ मध्ये १.९ दशलक्षांवर गेली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही ३३१ टक्के वाढ आहे. तर वितरित केलेल्या कर्जाचे मूल्य ९२१ कोटी रुपये आहे, ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ३३४ टक्के आहे. ओमायक्रॉन साथीचा तात्पुरता परिणाम व्यापारी कर्ज वितरणाच्या प्रमाणावर अगदी अल्पकाळासाठी दिसून आला, पण यामुळे एकंदर वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. प्लॅटफॉर्मद्वारे जानेवारी-२२ मध्ये प्रक्रिया झालेल्या जीएमव्हीचे एकत्रित मूल्य मागील वर्षाच्या तुलनेत १०५% वाढीसह सुमारे ८३,४८१ कोटी रुपये (११.२ अब्ज डॉलर्स) पोहोचले.


       जानेवारी २०२२ मधील सरासरी मासिक व्यवहार करणारे वापरकर्ते (एमटीयू) ६८.९ दशलक्ष होते, मागील वर्षाच्या तुलनेत यात ४० टक्के वाढ नोंदवली गेली. जानेवारी २०२२च्या समाप्तीपर्यंत देशभरात २.३ दशलक्षांहून अधिक उपकरणे तैनात करण्यात आली. यातून कंपनीचे ऑफलाइन पेमेंट्स क्षेत्रातील आघाडीचे स्थान स्पष्ट होते.


       पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “पेटीएम आमच्या प्लॅटफॉर्मवर विस्तृत वाढ साध्य करत आहे, कारण पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल), व्यापारी कर्जे तसेच व्यक्तिगत कर्जे यांच्या स्वीकृतीत वाढ होत आहे. आम्ही आमचा ऑफलाइन पेमेंट्स व्यवसायही सातत्याने विस्तारत आहोत, यासाठी देशभरात अधिकाधिक उपकरणे तैनात केली जात आहेत. आमचे ग्राहक व व्यापारी आमच्यावर जो विश्वास दाखवत आहेत, त्यातून आमचे प्रयत्नही दिसून येत आहेत. आमच्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वापरकर्त्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.”

Post a Comment

0 Comments