रस्त्यात ठिय्या मांडत कल्याण पूर्वेत महाविकास आघाडीचे आंदोलन

   

■केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेना ही मोर्चात सहभागी..


कल्याण : रस्त्यात ठिय्या मांडत कल्याण पूर्वेत महाविकास आघाडीने आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनेसह रिपाईचे कार्यकर्ते देखील मोर्चात सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकासआघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.


भाजप विरोधात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. कल्याण पूर्व येथे शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कोळसेवाडी गणपती मंदिर ते कोळसेवाडी पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत भाजप सरकारचा निषेध नोंदवला. या मोर्चात भाजपच्या निषेधाचे फलक घेत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन केले. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला.


या निषेध आंदोलन मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, शिवसेनेचे नेते अल्ताफ शेख, माजी नगरसेवक प्रशांत काळे, शरद पाटील, हर्षवर्धन पालांडे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख विजया पोटेकॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडत नाही म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुउपयोग करून महाविकास आघाडीला केंद्र सरकार घेरण्याचा प्रयत्न करीत आहेकेंद्र शासन आणि त्यांच्या तपास यंत्रणेच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी कल्याण पूर्वेत महाविकास आघाडी सरकारमधील तीन प्रमुख घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत निषेधाचे निवेदन कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांचे कडे देण्यात आले.      नवाब मलिक यांना ईडी ने हेतुपुरस्कर अटक करून राज्य सरकारला बदनाम करणाचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी केला. तर केंद्र शासन आणि ईडी तपास यंत्रणेच्या कोणत्याही दबावाला महा विकास आघाडी बळी पडणार नसल्याचे काँग्रेस आय चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले. 


डी च्या माध्यमातून  अशा प्रकारच्या कारवायांना महाविकास आघाडी भिक घालणार नसल्याचे शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा संघटक प्रशांत काळे यांनी सांगितले. तर शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा निषेध करीत ठाकरे सरकार हे जशास तसे उत्तर देत आणखीन खंबीर पणे राज्यातील सत्तेत कायम राहिल असे सांगितले.

Post a Comment

0 Comments