मोकाशी पाड्यातील शेतकरी वादाला राजकीय स्वरूप मनसे आमदारांनी भडकविल्यामुळे शेतकऱ्याने दिली खोटी तक्रार

■शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा  मनसे आमदारांवर आरोप तर पिडीत शेतकऱ्यांसोबत असल्याचे राजू पाटील यांचे प्रत्युत्तर


कल्याण : कल्याण तालुक्यातील मोकाशी पाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वादाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे पुन्हा एकदा शिवसेना मनसे आमने सामने आले आहेत. मनसे आमदारांनी भडकविल्यामुळे शेतकऱ्याने खोटी तक्रार दिली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  केला आहे. तर मी राजकरण केलं नसून मी पीडित शेतकऱ्यांसोबत असल्याचे प्रत्युत्तर मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलं आहे.


कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मोकाशी पाडा येथे जमिनीवरून झालेल्या वादातून शेतकरी कुटुंबावर शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात केडीएमसीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह इतर १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही तासातच म्हात्रे याच्या चालकाच्या तक्रारीनुसार शेतकरी कुटुंबीयावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


याबाबत रमेश  म्हात्रे यांनी आरोपांचे खंडन करत मनसे आमदार राजू पाटील यांना लक्ष केलंकोणालाही आमच्याकडून मारहाण करण्यात आली नाही. शेतकरी कुटुंबाला आजी माजी आमदारानी भडकविले. आमदारांचे काम विकास कामे करणे आहे, भांडण मिटवणे आहे. अशा पद्धतीच कृत्य करणं त्यांचं काम नाही अशी टीका मनसे आमदारांवर केली.


तर मनसे आमदार राजू पाटील यांनी माझा मतदार संघ आहे. माझा लोकांवर अन्याय होत असताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकू नये तर मी आमदार कसामी शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी आहे असा पलटवार म्हात्रे यांच्यावर केला आहे. दरम्यान जमिनीवरून झालेल्या वादाचे आता राजकीय वादात रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे. 

Post a Comment

0 Comments