केंद्रात मिनिस्टर ऑफ ड्रेस मेकिंग' असे मंत्रिपद नेमा.. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांचा उपरोधिक सल्ला


डोंबिवली ( शंकर जाधव ) कर्नाटक राज्यात हिजाब प्रकरणी महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे.यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'केंद्रात मिनिस्टर ऑफ ड्रेस मेकिंग असे मंत्रिपद नेमा'असा उपरोधिक सल्ला दिला.कल्याणात दामोदर सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन देण्यासाठी गृहनिर्माण मंत्री आव्हाड आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी हिजाब प्रकरणावर थोडक्यात भाष्य केले.

 
           तर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादीचा शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा विचार आहे का असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर शिवसेनेच्या मनात काय हे समजायला मी ज्योतिषी नाही असे उत्तर दिले.
तर कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हद्दीत विकास झाला आहे या प्रश्नांवर उत्तर देताना आव्हाड यांनी कल्याण- डोंबिवलीत  विकास हरवला आहे असे सांगितले.


            यावेळी प्रदेश सचिव  प्रमोद हिंदुराव कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, सुधीर पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments