ह प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची व आय प्रभागातील रंगीला बार अँड रेस्टॉरंट सील करण्याची धडक कारवाई


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आय प्रभागातील हॉटेल रंगीला बार आणि रेस्टॉरंट यांनी कोरोना साथीच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पत्रान्वये कळविल्याप्रमाणे आय प्रभागातील रंगीला बार अँड रेस्टॉरंट सील करण्याची धडक कारवाई आज सहा. आयुक्त संजय साबळे यांनी केली. हि कारवाई महापालिका अधिकारी, कर्मचारी व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.


       त्याचप्रमाणे ह प्रभागातही विभागीय उपआयुक्त  डॉ. सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली   सहा.आयुक्त अक्षय गुडधे यांनी  जुनी डोंबिवली, डोंबिवली (प.) येथील बांधकाम धारक विलास लक्ष्मण  पाटील यांच्या तळ + ७ मजल्याच्या आर.सी.सी इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली.  सदर कारवाईअनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी  यांच्या मदतीने व ६ ब्रेकरच्या  सहाय्याने  करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments