ठाणे जिल्ह्यातील रेल्वेचे नवीन प्रकल्प आणि रखडलेल्या कामांना गती देण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न...


भिवंडी दि 23 (प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यातील रेल्वेचे विविध नवीन प्रकल्प आणि रखडलेल्या कामांना गती देण्या संदर्भात आढावा घेण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे सह राज्य शासनाच्या महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.


          या बैठकीत कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम , कल्याण - कसारा आणि कल्याण - कर्जत रेल्वेच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी समजावून घेत या मार्गांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश कपिल पाटील यांनी दिले असून  कर्जत-कसारा- डहाणू नवीन रेल्वे लाईन सुरू करणे ,बदलापूर होम प्लॅटफॉर्मच्या कामा संदर्भात बैठकीत आढावा घेत कल्याण ते कसारा जेवढे रोड ओव्हर ब्रीज (ROB) मंजूर आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.


        या शिवाय कल्याण - मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी येणाऱ्या अडचणी , वसई-पनवेल सबर्न कॉरिडॉर तयार करणे , दिवा - वसई मार्गावर पिंपळास स्थानकाची निर्मिती करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. अंजुरफाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्या साठी दुसरा रेल्वे अंडरपास तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना या बैठकी दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली .

Post a Comment

0 Comments