शिवसेने विरोधात भाजपची डोंबिवलीत बॅनरबाजीडोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत युती करून सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजपा पक्षाने आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.`डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी`अश्या प्रकारचे बॅनर डोंबिवलीतील अनेक चौकात लावून भाजपने थेट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.


           भाजप सरकारने मंजूर केलेले  प्रमुख ३० रस्ते नगरविकास मंत्र्यांनी रद्द केले असा आरोप बॅनर मधून करण्यात आला आहे.काही दिवसांपासून पत्रकार परिषदेतून हे दोन्ही पक्ष आरोप करत होते. आता भाजपने बॅनरच्या माध्यमातून आरोप करण्यास सुरुवात केल्याने शिवसेना बॅनर लावून या आरोपाला कसे उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.


       याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, राज्यात भाजप सरकार असताना राज्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करत असताना एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्ते काँक्रीटकरण कामासाठी डोंबिवलीतील ३४ रस्ते ४७०.८२ कोटी रुपये मंजूर झाले होते . मात्र गेली अडीच वर्ष पाठ्पुरावा करत असताना हे रस्त्याचे काम रद्द झाले.शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण-डोंबिवलीच्या विकासाआड येत आहेत. 

  

      भाजप नगरसेवकांच्या फाईल्स दाबून ठेवणे, आयुक्तांवर, प्राधिकरण अधिकाऱ्यांवर दबाव टाकत स्वार्थी हेतूने शहराच्या विकास अडथळा टाकण्याचे काम शिवसेनेकडून केले जात असल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला आहे.   

Post a Comment

0 Comments