राष्ट्रीय तायक्वांदो निवड चाचणी आज पासून सुरूवात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन


कल्याण :  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि इंडिया तायकांदो यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे तायक्वांदो राष्ट्रीय निवड चाचणी ला आज सुरुवात झाली. या उद्घाटन समारंभ साठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडआमदार अतुल सावे, ग्रँडमास्टर किरॅश बहरीवर्ल्ड तायक्वादोचे भारतीय कॉर्डिनेटर व ग्रेडमास्टर हसन मलेको मोगदम तसेच भारतीय तायक्वांदो महासघाचे अध्यक्ष नामदेव शिरगावकरतायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.


 

या उद्घाटन प्रसंगी बोलताना भागवत कराड यांनी तायक्वांदो या खेळाला शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच तायक्वांदो या खेळाला नामदेव शिरगावकर आणि संदीप ओंबासे यांनी राज्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. असे सांगितले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपा राज्य सचिव प्रवीण घुगे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, के. डी. शार्दुल जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष डॉ. तिरुमल जे. कर्नाटक रेफ्री चेअरमन (क्युरेगी/फुमसे) प्रविण बोरसेताम संघटनेचे टेक्रिकल डायरेक्टरपुणे सुभाष पाटीलरायगड मास्टर विनोद कुमारइंडिया तायक्वांदो अमित अग्रवालऔरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी आयोजन मुख्य सहकारी नीरज बोरसेप्रसाद कुलकर्णी, सहसचिव गफार पठाण मुंबईचे राहुल  वाघमारे व विजय कांबळे  आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments