मराठी राजभाषा दिन आणि अभिनय कट्ट्याचे ११ वे वर्धापन दिन सोहळा.


ठाणे, प्रतिनिधी : मराठी राजभाषा दिन ११ व्या  अभिनय कट्ट्याच्या वर्धापन दिनानिमित्त आणि शहरातील ५५ मंडळांना अभिनय कट्टा गौरव २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २७ फेब्रुवारी म्हणजेच वि .वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस अर्थात मराठी राजभाषा दिन, आणि सोबत अभिनय कट्ट्याचे ११ वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून मराठी अभिमान मराठी माणसाचा संस्कार संस्कृती जपण्याचा या कार्यक्रमाचे आयोजन किरण नाकती यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.


  
           या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर ,ज्येष्ठ समीक्षक डॉ अनंत  देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक डॉ र म शेजवलकर यांच्या हस्ते करण्यात आले . ठाणे शहराचा सांस्कृतिक चेहरा असलेल्या अभिनय कट्ट्याच्या आजवर केलेल्या प्रवासाबद्दल चा आढावा या कार्यक्रमातून घेण्यात आला. समस्त महाराष्ट्रातील हजारो कलाकारांनी आजपर्यंत अभिनय कट्ट्यावर आपली कला सादर केली .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी २७ फेब्रुवारी २०११ रोजी आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या माध्यमातून किरण नाकती यांनी अभिनय कट्टा ही एक चळवळ सुरू केली .


             अभिनय कट्टा ठाणे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले केवळ महाराष्ट्रातच नाही ,तर भारतात 'सिंड्रेला'  ह्या चित्रपटाची निर्मिती झाली. त्याचा सुद्धा सन्मान करण्यात आला. आदित्य प्रतिष्ठान ठाणे या संस्थेच्या माध्यमातून गेली २२ ते २३ वर्ष कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे काम करण्यात आले आहे . त्यासोबत  नाट्यक्षेत्रातील दैदित्यवान कामगिरी नेहमीच बजावण्यात कार्य हे अभिनय कट्ट्याचने केले आहे. कलागुणांना वाव देणारा आपला अभिनय कट्टा 12 व्या वर्षात पदार्पण करत आहे गेल्या अकरा वर्षांत अभिनय कट्ट्यावर अनेक नवोदित कलाकारांनी आपली कला सादर केली. 


            कोणत्याही प्रकारची वयाची अट नाही व कोणत्याही प्रकारची आर्थिक अट नसताना प्रत्येकाला संधी देण्याचे काम किरण नाकती यांनी अभिनय घटनेच्या माध्यमातून केले. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आशीर्वाद दिला आणि ह्या संस्थेला सुरुवात झाली. तसेच ठाण्यातील समस्त नागरिकांचे, ठाणे महानगर पालिका प्रशासनाचे ,सर्व लोकप्रतिनिधींचे व उपस्थित सर्व रसिक मायबापांचे ,त्याचप्रमाणे आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी आपली कला सादर केली त्या प्रत्येक कलाकारांचे किरण नाकती यांनी आभार मानले.


           मराठी राज्यभाषा दिनानिमित्त खऱ्या अर्थानं मराठी संस्कृती जपण्याचे काम तळागाळातील प्रत्येक मंडळ करत असते,  मग ते सार्वजनिक गणेशोत्सव असो सार्वजनिक गणेशोत्सव नवरात्रोत्सव असो किंवा शिवजयंती असो किंवा अन्य कोणताही सण उत्सव साजरा करण्यासाठी जी मंडळ पुढाकार घेतात त्या प्रत्येक मंडळ यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी त्या प्रत्येक मंडळांना अभिनय कट्टा गौरव २०२२ या पुरस्कारानं सन्मानित केले .प्रत्येक मंडळाबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.


         श्री साईदत्त मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, संतोषी माता मित्र मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, साईबाबा मित्र मंडळ , ओमकार मित्र मंडळ, हनुमान सेवा संस्था, मातृछाया क्रीडा मंडळ, बालविकास क्रीडा मंडळ ,चेंदणी कोळीवाडा जमात ट्रस्ट ,श्री गुरुदत्त सेवा मंडळ आशीर्वाद मित्र मंडळ ,नवचैतन्य मित्र मंडळ, सार्वजनिक शिवजयंती उत्सव ,आशीर्वाद महिला बचत गट, माघी गणपती गणेश मित्र मंडळ ,साई वात्सल्य मित्र मंडळ, जय शिवराय प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ, हनुमान क्रीडा मंडळ, स्वामी समर्थ फाउंडेशन, शिव अ अपर्ण मित्र मंडळ, सत्कार फाउंडेशन, विठ्ठल-रुक्मिणी सेवा मंडळ, ज्ञानदेव सेवा मंडळ ,पिंपळेश्वर महिला मंडळ ,श्री मित्र मंडळ, साई धाम पदयात्रा मंडळ ,जय अंबे मित्र मंडळ, दत्त मंदिर, आनंद सावली स्वामी समर्थ मठ ,नरवीर हनुमान मित्र मंडळ ,गाव देवी मंदिर स्टार गल्ली मित्र मंडळ, नवनाथ मित्र मंडळ ,राजमाता विकास मंडळ, साई किरण मित्र मंडळ ,अर्जुन एकता मित्र मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ ,साईकृपा माघी गणेशोत्सव मंडळ ,नौपाडा चा महाराजा, शिव कृपा मित्र मंडळ ,नवजवान मित्र मंडळ, सामना युवा प्रतिष्ठान पाचपाखडी, जनविकास मंडळ ,शिव ओमकार सेवा मंच ,सामना युवा शिवगर्जना मित्र मंडळ ,जय वीर हनुमान मंदिर ,साई शक्ती मंडळ ,जय वीर हनुमान गोविंदा पथक, महिला बचत गट, मित्र मंडळ फाउंडेशन, शिवशाही प्रतिष्ठान नवजिवन सहकारी मंडळ ,मराठा समाज सामाजिक संस्था, दोस्ती फाउंडेशन, राज दीप सोसायटी इ.  ५६ मंडळांना आणि संस्थांना अभिनय कट्टा या पुरस्काराने गौरवण्यात आले.


           प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात बाल कलाकार आणि गायलेला पोवाडा असेल, तसेच निनाद कदम व सई कदम यांनी केलेलं काव्यवाचन असेल, त्याच प्रमाणे या केंद्रातील दिव्यांग मुलांनी सादर केलेली नृत्य असेल अनंत मुळे ,विनोद पवार, हरीश सुतार, अपर्णा वाडदेकर ,मनीषा रानडे या संगीत कट्ट्याच्या  कलाकारांनी सादर  केलेल्या गाण्यांनी विविध करमणूक व विविध संस्कार संस्कृती जपणाऱ्या कार्यक्रमाने खरतर या पुरस्कार सोहळ्याला अधिक रंगत आणली.
 


           खऱ्या अर्थानं ११व्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध मायबाई बापांची दाद मिळाली. अभिनय कट्ट्याचे राजन मयेकर, माधुरी कोळी, परेश दळवी ,कदीर शेख त्याचप्रमाणे विजय पडवेकर या सर्वांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कोळी ह्यांनी केले.

Post a Comment

0 Comments