श्री चैतन्य शाळेच्या ग्रँड कार्निवलला उत्स्फूर्त प्रतिसाद दोनशे विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग


कल्याण : कल्याण मधील श्री चैतन्या शाळेच्या वतीने कोरोना या जागतिक महामारी नंतर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये यावे आणि शिक्षणाबरोबरच  मौज-मजा करावी  यासाठी पहिल्या कार्निव्हल आयोजन करण्यात आले होते यामध्ये  200  हून अधिक मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला.


          या कार्निवल मध्येनृत्यासारखे  मजेदार खेळ, ड्रामा याचा चिमुकल्यांनी आनंद लुटला. पालकांसाठी  फन गेम  आणि मुलांसाठी सेल्फ डिफेन्स वर  छोटे सत्र आयोजित केले होते. फान गेम, मौजमजा बरोबर अल्पोपहार चे 8 स्टॉल्स ही होते. ग्रँड कार्निव्हलची सांगता पारितोषिक वितरण समारंभ नी सांगता करण्यात आला.


           या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी शाळेचे एजीएम सुरेंद्र राजरिकम, मुख्याध्यापिका पी. सीता आणि भाग्यश्री पिसोळकर उपस्थित होते. तसेच श्री चैतन्य टेक्नो स्कूल चे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापक टीम कार्य करत होती.

Post a Comment

0 Comments