भिवंडी पालिका मूकबधिर सफाई कामगारास जबर मारहाण ,कामगारांचा आंदोलनाचा इशारा...


भिवंडी दि 11(आकाश गायकवाड  ) अमरावती पालिका आयुक्त प्रविण आष्टीकर यांना मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच भिवंडी पालिका क्षेत्रात स्वच्छता करणाऱ्या मूकबधिर दिव्यांग सफाई कामगारास  ठोशाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने कामगार कर्मचारी अधिकारी यांनी पालिका मुख्यालया बाहेर येविन निदर्शने करीत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक न केल्यास सोमवार पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


        किशोर बळीराम पाटील असे मारहाण झालेल्या मूकबधिर सफाई कामगारांचे नाव आहे.भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील शांतीनगर परिसरातील गुलजार नगर या परिसरात किशोर पाटील हा मूकबधिर सफाई कामगार झाडू मारण्याचे काम करीत असताना त्या ठिकाणाहून जाणारा युनूस खान यांच्या अंगावर कचरा उडत असताना त्याने थांबण्यास सांगितले असता मूकबधिर असल्याने ते न समजल्याने किशोर पाटील हा कामगार आपले झाडू मारण्याचे काम करीतच राहिल्याने चिडून जवजन युनूस खान याने सफाई कामागारस ठोशा बुक्याने बेदम मारहाण केली .


         या मारहाणीने किशोर जखमी झाला असून त्यावर आयजीएम उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या बाबत पालिका कामगार संघटना प्रतिनिधी व स्थानिक प्रभाग समिती क्रमांक एक मधील अधिकारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तक्रार दाखल कातून घेण्यास टाळाटाळ केल्याने दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास कामगार अधिकारी या सर्वांनी मुख्यालय प्रवेशद्वारावर एकत्रित होत या हल्याच्या निषेध करीत सायंकाळ पर्यंत आरोपीस अटक न केल्यास सोमवार पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे इशारा कामगार संघटना प्रतिनिधींनी दिला आहे .        अमरावती येथील घटना ताजी असताना भिवंडीत सफाई कामगारांवर झालेला हल्ला हा निषेधार्थ असून उच्च अधिकारी ,कर्मचारी अथवा चतुर्थ श्रेणी कामगार या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी पालिका प्रशासन म्हणून आम्ही नक्कीच घेऊन यामध्ये दुजाभाव न करता मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला आहे..

Post a Comment

0 Comments