टिटवाळा येथील खेळाडूंचे राज्य स्तरीय आर्चरी चॅम्पियशिप साठी निवड


कल्याण : लॉकडाऊन नंतर वायलेनगर कल्याण येथे झालेल्या पहिल्याच जिल्हास्तरीय आर्चरी चॅम्पियशिप स्पर्ध्ये मध्ये ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या खेळाडूंनी सहभाग घेतला आणि आर्चरी मध्ये प्रतेक वयोगटामध्ये आपले यश संपादन केले आहे.


यामध्ये टिटवाळा आणि वासिद या ग्रामीण भागातील खेळाडूंनी देखील सहभाग घेतला असून खुल्या  वयोगटामध्ये विनायक श्रावण कोळीसमाधान कोंढावले, गणेश गायकवाड यांनी सुवर्ण पदक मिळविले आहेत.  राज्यस्तरावर होणाऱ्या आर्चरी स्पर्ध्येसाठी त्यांची निवड झाली असून लवकरच येणाऱ्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार आहेत. 


या जिल्हास्तरीय आर्चरी चॅम्पियशिप स्पर्धेमध्ये फिल्ड आर्चरी असोसिएशन ऑफ ठाणे चे सचिव महादेव क्षीरसागरअध्यक्ष सुनील वायले तसेच इतर मान्यवर आणि आयोजकांच्या उपस्थिती मध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments