कल्याण : डोंबिवली सह २७ गावांची नविन महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी कॉंग्रेसने केली असून याबाबत कॉंग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या २७ गावांची डोंबिवली शहरासह एक वेगळी महानगरपालिका स्थापन करण्यात यावी. हि गावे महानगरपालिकेत समाविष्ट करूनही, ना तर ती गावे समाधानी आहेत ना तिथे काही नागरी सुविधा निर्माण करण्यात सध्याच्या पालिकेला काही ठोस प्रगती करता आली.
यापेक्षा त्या गावातील मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था झाली आणि त्याला नव्याने निर्माण झालेले खोणी पलावाचा पूर्ण भाग, आणि डोंबिवली मिळून एक नवीन महानगरपालिका निर्माण झाली तर त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन होऊन ह्या संपूर्ण भागाचा उत्कृष्ट विकास साधता येईल. नागरी समस्या सहज आणि जलद गतीने सोडवता येतील.
त्यामुळे २७ गावे केडीएमसीमधून वगळून डोंबिवली, खोणी पलावा आणि ही २७ गावे मिळून नवीन महानगरपालिका अस्तित्वात आणण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
0 Comments