केडीएमसीच्या ई प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ई प्रभागात सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व परिसरातील सांगरली चौकमानपाडा परिसरातील ७ जोते व ५ गाळे निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिकेचे पोलिस कर्मचारीमानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.


सांगरली चौक ते जिमखाना जिमखाना ते घारडा सर्कल  पेंढारकर कॉलेज पासून मानपाडा रोड ते डी मार्ट पर्यंत फेरीवाला अनधिकृत बांधकाम टपऱ्या जोते  यांच्यावर  निषकाशना ची कारवाई करण्यात आली. या  कारवाई मध्ये १३० मंडप शेड व १६ टपर्‍या तोडण्यात आल्या.


त्याचप्रमाणे ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली (प) येथील गणेश नगरपावर हाउस जवळ चालू असलेल्या १३ जोत्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व २ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments