'एक दौड जवानांसाठी' मध्ये १०० स्पर्धक सहभागी


डोंबिवली ( शंकर जाधव ) मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवली मनसे शहर शाखेतर्फे रविवारी 'एक दौड जवानांसाठी' गेट वे ऑफ इंडिया मुंबई ते डोंबिवली अशी 65 किलोमीटर ची दौड आयोजित केली होती.यात  ठाणे रायगड जिल्ह्यातील खेळाडू ,डॉक्टर सहभागी झाले होते. रात्री 12 वाजता सुरू झालेल्या   गेट वे ऑफ इंडिया  ते डोंबिवली  महिला व पुरुष मिळून १०० जण सहभागी झाले होते. 


            यातून मिळणारा निधी हा जवानांना मदतीसाठी दिला जाणार असल्याचे मनसे  आमदार ( राजू ) यांनी सांगितले. दौड संपल्यावर आमदार पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते  धावपटूचा सन्मान  करण्यात आला. मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर केला पाहिजे असे  आमदार पाटील यावेळी आवाहन केले.

Post a Comment

0 Comments