कल्याण : भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ७५ कोटी सूर्यनमस्कार या उपक्रमा अंतर्गत डोंबिवलीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सलग एकवीस दिवस सूर्यनमस्कार घातले. या कार्यक्रमाचा सांगता समारंभ शुक्रवारी नेहरू मैदानावर पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे हे उपस्थित होते.
याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी, क्रीडा शिक्षक लजपत जाधव, प्रशिक्षक मार्शल फिलिप्स व शाळेतील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले तसेच सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणून सूर्यनमस्कार यांची गणना केली जाते. हा व्यायाम प्रकार भारतातील प्रत्येकाने करणे ही काळाची गरज आहे. ७५ कोटी सूर्यनमस्कार या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक ठिकाणी हा सूर्यनमस्कार उपक्रम चालू ठेवणे हाच या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू असल्याचे अविनाश ओंबासे यांनी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यास पूर्ण सूत्रसंचलन शिक्षिका दळवी यांनी केले. मुख्याध्यापिका कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. तर खरात यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी शिक्षक धांगडा, शिक्षिका नाठे व मोनिका पाटील यांनी परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 Comments