व्हॅलेंटाईन डे निमित्ताने टीम परिवर्तनचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न वीट भट्टी वरील कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप


कल्याण : समाजातील वंचित आणि गरजुदुर्लक्षित घटकांपर्यंत त्यांना आवश्यक अशा गोष्टी म्हणजेच कपडेशैक्षणिक साहित्यसायकलघरगुती उपयोगाच्या वस्तु इत्यादी टीम परिवर्तन वेळोवेळी पुरवत असते असाच एक प्रयत्न वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून टीम परिवर्तनने पुन्हा एकदा केला आहे.


व्हॅलेंटाईन डे निमित्ताने टीम परिवर्तनचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत पोटगाव परिसरातील वीटभट्टीवरील कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेसाठी पेस्टब्रश आणि साबण देखील कामगारांना देण्यात आले. साहित्य वाटपासाठी रेनिता लोपेससीमा आपटेश्रुती अय्यर यांनी विशेष सहकार्य केले. यावेळीं टीम परिवर्तनचे शोभा बोडकेतुषार वारंगभुषण राजेशिर्केअविनाश पाटील उपस्थित होते.


टीम परिवर्तन प्रामुख्याने शिक्षणआरोग्यक्रीडा या विषयांच्या अनुषंगाने प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागांतील वंचित समाज बांधवांसाठी सातत्याने काम करत आहे. क्रीडा क्षेत्रांत ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळावी यांसाठी पुढील काळात टीम परिवर्तन काम करणार असल्याचे यावेळीं तुषार वारंग यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments