ठाकुर्ली उड्डाण पूलावर पालिका आणि रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी... मनसेने केली पुलाच्या कामाची पाहणी


डोंबिवली ( शंकर जाधव ) ठाकुर्ली उड्डाण पुलावरील कामासाठी दोन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या आधी सदर पुल तयार असल्याचा ढोल सत्ताधारी आणि प्रशासनाने बडवला होता. मात्र काही दिवसात पुलावर खड्डे पडल्यावर आधी मनसेने आणि त्यानंतर भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते.आता पुन्हा पूल कामासाठी बंद केल्याने मनसेने सोमवारी दुपारी पुलाच्या कामाची पाहणी केली. ठाकुर्ली उड्डाणपूलबाबत पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर बोट ठेवल्याने मनसेने यावर ठाकुर्ली उड्डाणपूलवर पालिका आणि रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी असल्याची टीका केली.

  

       डोंबिवली पुर्वेकडुन पश्चिमेकडे जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपुलाचे उतारमार्गावर  खड्डे पडल्याने  वाहतुक कोंडी होत आहे. कल्याण डोंबिवली महानगापालिकेने सदर पुलाच्या पुर्नपृष्ठीकरणाकरीता मास्टीक अॅस्फाल्ट या कामाकरीता दोन दिवस पुलावरील वाहतूक बंद ठेवली आहे.सोमवारी दुपारी प्रेम पाटील, मानस पाटणे,अर्णवकुमार सुरवसे, पप्पू भालेराव आणि उमेश चौधरी आदि मनसैनिकांनी पुलावरील कामाची पाहणी केली.यावेळी पालिकेचे अभियंता शैलेश मयेकर यांच्याशी मनसैनिकांनी चर्चा केली.मनसैनिक प्रेम पाटील यांनी पुलवरील सुरु असलेल्या कामाबाबत पालिका आणि रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. पालिका आणि रेल्वे प्रशासनाची ढकलगाडी असून यात सामान्य जनता भरडली जात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, टाळेबंदीच्या आधी ठाकुर्ली उड्डाणपूल बनविण्यात आला होता.


            कोपर पुलाचे काम सुरु असल्याने या पुलावर वाहतूक सुरु होती.मात्र चार-पाच वर्षात पुलावर खड्डे पडल्याने या पुलाचे निकृष्ट दर्ज्याचे झाल्याचे दिसते.तर पालिकेचे अभियंता मयेकर यांना विचारले असता ते म्हणाले,पुलाच्या पूर्वेकडील भाग पालिकेने तर पश्चिमेकडील काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. पालिकेने आपले काम उत्तम केले आहे. मात्र रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून जकाही चुका झाल्या आहेत.संपूर्ण पुलाच्या मेंटेनन्सची जबाबदारी पलिका प्रशासनाची असून आता पुलावर कॅबर करेशक्न काम सुरु आहे.पुलावर पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने वी पोल्स लावले गेले नाही. पुलाच्या मध्यभागातून वाहते पाणी वळणावर थाबंत असल्याने त्याठिकाणी खड्डे पडत होते.पुलाचे सुरुवातीचे कामात मातीचा थर आणि त्यावर डांबरीकरण केले होते.आता पुलावर कॅबर कनेशक्न करणार असल्याने पुलावर पाणी साठणार नाही.

 

        दरम्यान,पुलाला पाच वर्षही पूर्ण झाले नसून आतापासूनच पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत नागरिकांनी प्रशासनाच्या या कामाबत नाराजी व्यक्त केली आहे. पुलावर पडलेल्या खड्ड्यांबाबत केलेले आंदोलन जनता विसरली नाही.

 

चौकट

 

पुलावरील कॅबर करेशक्नच्या कामाला ७ ते ८ लाख रुपये खर्च... एप्रिल २०१८ रोजी ठाकुर्ली उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी मिळून २५ कोटी रूपये निधी खर्च आला होता.२०२२ सुरुवातीला पुलावर खड्डे पडल्याने पालिकेने कॅबर करेशक्नचे काम सुरु केले आहे. या कामाला पूर्वीच्या खर्चातून शिल्लक रक्कम असलेल्या रक्कमेतील ७ ते ८ लाख रुपये खर्च करून  काम करण्यात आल्याची  अशी माहिती पालीकेचे अभियंता शैलेश मयेकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments