भिवंडीत मोर्चा आंदोलनाला पोलिसांनी परवाणगी नाकारली ; नागरिकांना केले शांततेचे आवाहन


भिवंडी दि. १२ (प्रतिनिधी ) संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात गुरुवारी रात्री शांतीनगर पिराणीपाडा येथे चोरट्याला पकडायला गेलेल्या पोलिसांच्या हातून चोरटा निसटून भावाकडे लपून बसला असता त्याचा संशयीत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती . विशेष म्हणजे पोलिसांच्या झटापटीत हा मृत्यू झाल्याचा आरोप घरच्यांसह आजूबाजूच्या नागरिकांनी केल्याने रात्रभर या भागासह शहरातील वातावर तापले होते. 


          त्यातच शुक्रवारी हिजाब प्रकरणावरून शहरात आंदोलन करण्याचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते, त्यामुळे शहरातील वातावरण आणखीन तापण्याचे चिन्ह लक्षात घेत भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सतर्कता दाखवत नागरिकांना मोर्चा व आंदोलनासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, जर कोणी मोर्चा व आंदोलन करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या आदेश व सूचना देण्यात आल्या होत्या . 


           त्यांनतर पोलीस प्रशासनही सतर्क झाले होते. शुक्रवारी भिवंडीत ठिकाणी पोलिसांनी ठिकठिकाणी गस्त व चौकशी सुरू ठेवली होती. पोलिसांच्या सतर्कतेने शहरातील वातावरण शांत ठेवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.

             दरम्यना नागरिकांनी पोलिसांच्या सूचने कडे लक्ष देत कोणताही मोर्चा व आंदोलन केले नाही त्यामुळे शहरातील वातावरण शांत राहिल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी नागरिकांचे आभार मानले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच शहराची एकता व अखंडता कायम राहील यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असेही आवाहन पोलीस उपायुक्त योगेश  चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. 

Post a Comment

0 Comments