न्यू मनीषा नगर परिसरातील नागरिकांची ड्रेनेज समस्या निकाली

■ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरवात नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश...


कल्याण  : कल्याण पश्चिमेतील न्यू मनीषा नगर परिसरातील नागरिकांची ड्रेनेजची समस्या निकाली निघाली असून  ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला काल सुरवात करण्यात आली आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून हे काम होत असून नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


       कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ११ बेतूरकरपाडा, ठाणकरपाडा, रमाबाई आंबेडकर नगर या प्रभागातील साईबाबा नगर परिसारातील न्यू मनीषा नगर येथे चाळींचा परिसर आहे. या चाळींमधील ड्रेनेज लाईन हि गेल्या ५ वर्षांपासून खराब झाली होती. याबाबत येथील नागरिकांनी नगरसेवक मोहन उगले यांना समस्या सांगताच त्यांनी याकामासाठी पाठपुरावा करून कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून येथील ड्रेनेजच्या कामासाठी निधी प्राप्त करून घेतला आहे.


       गेल्या दोन वर्षापासून कोविडमुळे महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने आमदार निधीतून हे काम करण्यात येत आहे. शनिवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन येथील नागरिकांची ड्रेनेजच्या समस्येतून मुक्तता होणार असल्याचे नगसेवक मोहन उगले यांनी सांगितले. 


       यावेळी नगरसेवक जयवंत भोईर, महिला शहरसंघटक सुजाता धारगळकर, शाखा संघटक नेत्रा उगले, शाखा प्रमुख अनंता पगार, स्वप्नील मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments