कचोरे परिसरातील नागरिकांना रेशनकार्ड आणि ईश्रम कार्डचे वाटप

■परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचे आयोजन..


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कचोरे परिसरातील नागरिकांना रेशनकार्ड आणि ईश्रम कार्डचे वाटप करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, उपविभाग प्रमुख प्रभाकर म्हात्रे, सतीश जाधव, समाजसेवक प्रकाश चौधरी, हेमंत चौधरी, अरुण निंबाळकर, शाखाप्रमुख हरीश्चंद्र म्हात्रे,  युवासेना उपशहर अधिकारी कमलाकर चौधरी, लालमन पांडे, आर. के. सिंग, सागर खांडेकर, योगेश चौधरी, राहुल चौधरी आदीजण उपस्थित होते.


       नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हाभरात विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मनोज चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कचोरे परिसरात मोठ्या संख्येने आर्थिक दुर्लभ घटकातील नागरिक राहत असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात.


        अशा या नागरिकांना शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे परिसरातील या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी शिवसेना शाखेत रेशनकार्ड आणि ईश्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात नोंदणी केलेल्या नागरिकांना आज मान्यवरांच्या हस्ते या रेशनकार्ड आणि ईश्रम कार्डचे वितरण करण्यात आले.   


       शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना शाखेच्या माध्यमातून वर्षभर लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार नागरिकांची गरज लक्षात घेऊन रेशनकार्ड शिबीर आणि ईश्रम कार्ड शिबीर लावण्यात आले होते. यातील कार्डचे आज वितरण केले असल्याची माहिती परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी दिली.  

Post a Comment

0 Comments