डोंबिवली ( शंकर जाधव ) बदलापूर जवळील गोरेगाव परिसरातील जंगलात १ वर्षीय बिबट्याच्या पिलाच्या तोंडात प्लास्टिकचा जार अडकल्याचा व्हिडिओ एका पर्यटकाने व्हायरल केला होता.वन विभाग, डब्लू डब्ल्यू ए संस्था, आणि पॉज ह्या संस्थेने संयुक्तरित्या ३० तासापासून शोध घेतला. त्याला बेशुद्ध करून त्याच्या तोंडात अडकलेला प्लास्टिक जार काढण्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले.
त्याला त्या व्याधी पासून मुक्त करून वन अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिलाला जंगलात सोडले.स्वयंसेवक भूषण पवार, नीलेश भणगे, नवीन साळवे, ऋषिकेश सुरसे आणि देवेंद्र निलखे यांनी प्लॅस्टिकच्या बरणीत अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी मदत केली.
0 Comments