हिजाब प्रकरणी काँग्रेस राजकारण करत आल्याचा मुस्लिम महिलांचा आरोप आंदोलनात गालबोट लावण्याचा काँग्रेसचे म्हणणे..


डोंबिवली  ( शंकर जाधव ) कर्नाटक येथील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्यात उमटल्याचे दिसते.कल्याण शहरातही काँग्रेसने छञपती शिवाजी महाराज चौक येथे केलेल्या आंदोलनात मात्र मुस्लिम महिलांनी आक्षेप घेतला.काँग्रेस या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम महिलांनी केला. तर आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचे काँग्रेस महिला पदाधिकारी कांचन कुलकर्णी यांनी केला.
    
   
         हिजाब प्रकरणी  कल्याण येथे काँग्रेसच्या वतीने केलेल्या आंदोलनात काही मुस्लिम महिला आल्या होत्या.मात्र 'हिजाब आमचा हक्क आहे,वतो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ' असे सांगत यात राजकारण आणू नका असे यावेळी मुस्लिम महिलांनी सांगितले.आम्ही आपले म्हणणे मांडण्यासाठी आलो होतो पण इथे आल्याबर आंदोलन का असा प्रश्न पडल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


        यावर कॉंग्रेस पदाधिकारी कांचन कुलकर्णी यांना विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही शांतपणे आंदोलन करून कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचा निषेध नोंदविला.पण आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

Post a Comment

0 Comments