कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सम्राट अशोक विद्यालयात कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवून महापुरुषांनी निर्माण केलेला इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला जात असतो. शिवजयंतीच्या कार्यक्रमात इयत्ता आठवीच्या मुलींनी पाळणा गीत गाऊन नृत्य सादर करून शिव जन्मोत्सव साजरा केला.
ज्या प्रमाणे जिजाऊंनी शिवरायांना बालपणी स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार दिलेत त्याच प्रमाणे आपली आई सुद्धा आपल्या बाळाला चांगले नागरिक बनविण्यासाठी वेळोवेळी सुसंस्कार देत असते ते आपण अंगीकृत आणले पाहिजेत असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले.
कार्यक्रमात श्रद्धा साळुंके या विद्यार्थिनीने जिजामाता ची भूमिका केली तर कुणाल पडवळ हा विद्यार्थी शहाजी राजांच्या भूमिकेत होता. शिव जन्मोत्सवाच्या आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही घेतला. सर्व शिक्षकांनी भगवे फेटे बांधल्याने कार्यक्रमाचे एक आकर्षण होते.
0 Comments