चेंबूर येथील अनाथाश्रमा मधील मुलांना लीफ फिनटेकचा मदतीचा हात


मुंबई, १० फेब्रुवारी २०२२ : मुंबईतील फिनटेक कंपनी लीफ फिनटेकने चेंबूरमधील मारनाथा हार्वेस्ट मिशन ऑर्फनेज सोसायटी येथे 'हेल्पिंग हॅण्ड्स' कार्यक्रमाचे आयोजन केले. आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा (सीएसआर) भाग म्हणून टीमने चेंबूरमधील अनाथाश्रमाला किराणा माल व कादंब-या दान केल्या.


     एचआर टीममधील रिषभ सॅलियन, स्टेफि गोम्स, अंकिता गुप्ता आणि सोशल मीडिया टीममधील निमेश भाटिया हे कार्यक्रमाला उपस्थित होते. अधिकृत कर्जसुविधा उपलब्ध होऊ न शकणा-या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अथकपणे कार्य करणारी लीफ फिनटेक वंचित समुदायांचे ऋण फेडण्यास आणि त्यांना समक्ष करण्यास देखील कटिबद्ध आहे.


    लीफ फिनटेकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंग गोवर्धन म्हणाले, "लीफमध्ये आमचा स्थिररित्या व मुलभूतरित्या लोकांचा, विशेषत: अस्थिर उत्पन्न असलेल्या लोकांचा जीवनाचा दर्जा वाढवण्याचा मनसुबा आहे. तसेच आम्ही समाजाप्रती योगदान देण्यास देखील उत्सुक आहोत. आमचा नवीन उपक्रम अनाथाश्रमामध्ये राहणा-या मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या दिशेने आमचा लहानसा प्रयत्न आहे. 


      एनजीओचा प्रामुख्याने मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा मनसुबा आहे आणि आम्ही आता त्यांच्या या प्रवासाचा भाग आहोत. आम्ही श्री. सॅम्युएल नानिया यांचे आभार मानतो, जे त्यांच्या पत्नीसोबत एनजीओचे कार्यसंचालन पाहतात. आम्ही गरजूंच्या वाढ व विकासाप्रती आपले जीवन समर्पित केलेल्या लोकांना सलाम करतो."

Post a Comment

0 Comments