डोंबिवली ( शंकर जाधव ) शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. खंबालपाडा रस्त्याला लागून त्रिमूर्ती नगर हा झोपडपट्टी परिसर आहे. या परिसरातील नागरिक वस्तीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावर कचरा फेकणे, लहान मुलांना शौचास बसवणे , थुंकणे असा पद्धतीचे वर्तन करत होते.
हा रस्ता स्वच्छ रहावा यासाठी माजी नगरसेवक स्व. शिवाजी शेलार यांनी एका झाड विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाला बसवले. जेणे करून परिसर स्वच्छ राहील. हिरवागार दिसेल आणि या परिसरातील नागरिकांना ऑक्सिजन मिळेल या दृष्टीने हा व्यवसायिक बसवला आहे.
रस्त्यावरून जाताना परिसर हिरवागार, झाडावर आलेल्या फुलांमुळे रंगेबिरंगी दिसत आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावरून जाताना स्वच्छ आणि ऑक्सिजन युक्त वाटत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाची जनजागृती देखील करत असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments