सूर्या रोशनीच्या महसुलात वार्षिक २९ टक्क्यांची वाढ


मुंबई, १६ फेब्रुवारी २०२२ : सूर्या रोशनी लिमिटेड या भारतातील ईआरडब्ल्यू पाइप्सच्या सर्वात मोठ्या निर्यातदार, ईआरडब्ल्यू जीआय पाइप्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक आणि सर्वात मोठ्या लायटिंग कंपनीने सुधारित उत्पादन मिश्रणामुळे २०२२ च्या तिस-या तिमाहीसाठी आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊमाहीसाठी आर्थिक निष्पत्तींमध्ये उत्तम कामगिरीची नोंद केली.


       कंपनीने त्यांच्या दोन्ही व्यवसायांमधील (स्टील पाइप व स्ट्रीप्स आणि लायटिंग व कन्झ्युमर ड्युरेबल्स) मूल्यवर्धित उत्पादन विभागांमधील प्रबळ वाढ आणि उच्च स्टील किंमतींमुळे मागील वर्षाच्या तिस-या तिमाहीमधील १५७८ कोटी रूपयांच्या तुलनेत यंदाच्या तिस-या तिमाहीमध्ये महसूलामध्ये २९ टक्क्यांच्या वाढीसह २०३० कोटी रूपयांची नोंद केली. पण कच्चा मालाच्या उच्च किंमती व इतर आदान खर्चांमुळे मार्जिन्सवर दबाव राहिला, जे किंमतीमधील वाढीमुळे अंशत: ऑफसेट झाले.


       सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजू बिस्त म्हणाले, "कंपनीने स्टील पाइप्स, लायटिंग व कन्झ्युमर ड्युरेबल्समधील मूल्यवर्धित उत्पादनांच्या वाढत्या हिस्सासह वार्षिक स्थिर कामगिरीची नोंद सुरू ठेवली. आदान खर्च उच्च राहिल्यामुळे मार्जिन्सवर काही प्रमाणात परिणाम झाला. पण कंपनीने सक्रियपणे किंमतींमध्ये विविध वाढ केली आणि उच्च आदान खर्चांचे निर्मूलन करण्यासाठी पुढे देखील वाढ करत राहिल. प्रबळ ब्रॅण्ड उपस्थिती आणि 'सूर्या' ब्रॅण्डसाठी ग्राहकांच्या पसंतीमुळे या किंमतीमधील वाढीला बाजारपेठेमधून उत्तम प्रतिसाद मिळाला.”


      स्टील पाइप्स व स्ट्रीप्स व्यवसायामध्ये कंपनीने उच्च स्टील किंमती आणि मार्जिन अॅक्रेटिव्ह एपीआय पाइप्स व निर्यातीच्या सतत वाढत्या हिस्सामुळे महसूलात वार्षिक ३७ टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. मूल्यवर्धित उत्पादने व बाजारपेठांसह एपीआय अॅण्ड स्‍पायरल पाइप्स, अॅक्चुअल युजर्स व निर्यातींमध्ये स्थिर ४० टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली. 


    कंपनीकडे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ३२,००० एमटीची प्रबळ निर्यात ऑर्डर बुक करण्यात आली, तर याच कालावधीदरम्यान एपीआय कोटेड पाइप्स ऑर्डर बुक ५०,००० एमटी होती. अधिक पुढे जात जीआय पाइप्स, एपीआय कोटेड पाइप्स अशा मूल्यवर्धित उत्पादनांच्या हिस्सामध्ये आणि स्टील पाइप्स व स्ट्रीप्सच्या निर्यातीमध्ये वाढ करण्यावर लक्ष केंद्रित आहे.

Post a Comment

0 Comments