शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप ...

■के.व्ही. पेंढरकर महाविद्यालया समोर विश्व हिंदू परिषदेचे निदर्शने...


डोंबिवली (शंकर जाधव ) देशपातळीवरच नव्हे तर परदेशातहि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते.मात्र विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील के.व्ही.पेंढरकर महाविद्यालयात परवानगी दिली नसल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने करत सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयाच्या बाहेर निदर्शने केली.त्यानंतर महाविद्यालय प्राचार्य सुर्यकांत लसुने यांची भेट घेऊन परिषदेच्या शिष्टमंडळाने निवदेन दिले.मात्र परवानगी नाकारली नसून महाविद्यालयात सर्व थोर महापुरुषाची जयंती साजरी केली जात असल्याचे लसुने  यांनी सांगितले.


      १९ फेब्रुवारीला राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली.मात्र डोंबिवलीतील के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयात जयंती साजरी करण्यास परवानगी दिली नसल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद कल्याण शाखेने केला आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी महाविद्यालयासमोर निदर्शने केली. 


          जिल्हा संयोजक करण उल्लेंगण,धर्मप्रसार सहप्रमुख सागर शुक्ल, महाविद्यालय प्रमुख सन्नी पाटील, सुरक्षा प्रमुख दिनेश काळे, दुर्गा वाहिनी आणि काजल धरोलीया या शिष्टमंडळाने महाविद्यालय प्राचार्य सुर्यकांत लसुने यांना निवदेन दिले.यावेळी जिल्हा संयोजक उल्लेंगण म्हणाले,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यास महाविद्यालय प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे समाज माध्यमातून माहिती मिळाली. त्यामुळे या महाविद्यायाचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली.


          याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य लुसाने यांना विचारले असता ते म्हणाले, महाविद्यालयात दोन तरुण परवानगी साठी आले होते. मात्र ते महाविद्यालयाचे विद्यार्थी होते हे सांगू शकत नाही. त्यांना परवानगीसाठी लेखी निवदेन देण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्यांचे निवदेन आले नाही.परीक्षा सुरु असल्याने यावर्षी तारखेप्रमाणे नाही तर तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाईल.

Post a Comment

0 Comments