साद फाउंडेशनच्या प्रयत्नाने वाघिणीची वाडी येथे शालेय वर्गखोली उपलब्ध


कल्याण : साद फाउंडेशन ही संस्था बेडीस गाव येथे शिक्षणआरोग्यक्रीडा इत्यादी विषयांवर सातत्यपूर्ण काम करत आहे. संस्थेने आजवर प्रामुख्याने बंधारा बांधणीशिक्षण केंद्र तयार करून गावांतील पाण्याच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर मूलभूत काम केले आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील संस्था सातत्याने काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून वाघिणीची वाडीबेडीस गाव येथे वर्गखोली लोकार्पण नुकतेच करण्यात आले. महेश विसाळ जेसिएम मेंबर अंबरनाथरक्षा मंत्रालय यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी शिवाजी खारीक सरपंच शेलू ग्रुप ग्रामपंचायत  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर अडव्होकेट अनुज नरुलाआर्ट ऑफ लिव्हिंगचे सुरेश पाटीलसीए निखिल काळे आणि सत्कर्म फाउंडेशनचे दत्तात्रय सावंत हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र कांबळेशाळा व्यवस्थापन समितीचे पुंडलिक सांबरी आणि ग्राम पंचायत सदस्य अशोक वाघप्रकाश दरवडाबुधीबाई दरवडासंगीता बांगारी यांचे वर्गखोली बांधण्याच्या कामांत विशेष योगदान लाभले. संस्थेच्या सदस्या माधुरी पुराणिक यांनी उपस्थितांचे यावेळीं स्वागत केले तर अविनाश पाटील यांनी सादच्या कामांचा यावेळीं आढावा दिला.


कार्यक्रमात आभार प्रदर्शन योजना घोसाळकर यांनी केले. उपक्रमाचे व्यवस्थापन भुषण राजेशिर्के आणि ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येत केले. साद फाउंडेशन ही संस्था अत्यंत दुर्गम भागात सातत्याने काम करत आपल्या वंचित समाज बांधवांसाठी काम करत आहे यापुढेही क्रीडा आणि रोजगार विषयक कामांसाठी संस्था पुढाकार घेवून काम करत राहणार आहे. यांसाठी सर्वांनी मिळुन एकत्र काम करण्याची गरज आहे असे संस्थेचे संस्थापक प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments